चांद्रपुरात काँग्रेसने बंद पाडून नोंदविला केंद्र सरकारचा निषेध

भारत बंदमध्ये सहभाग : जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, प्रकाश देवतळे यांनी केले नेतृत्व

चंद्रपूर : केंद्रातील जुलमी व अत्याचारी भाजप सरकारविरोधात सोमवारी (ता. २७) भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यामुळे संपूर्ण देशाची आर्थिकस्थिती ढासळली आहे. हे कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी जगाचा पेशिंदा मागील ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. तरी या जुलमी सरकारला त्यांची किव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे.

त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महगाई निर्माण करून अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींचे खिशे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरु आहे. या महगाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. देशातील तरुणांना बेरोजगार करण्यात आले आहे. त्यामुळे या जुलमी व अत्याचारी भाजप सरकारविरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना , डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून, भारत बंदचे आयोजन केले होते.

या आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, मनपातील विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, ओबीसी विभागाचे उमाकांत धांडे, माजी सभापती संतोष लहामगे, चंद्रम्मा यादव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, बापू अन्सारी, राजेश अडूर, कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी, प्रसन्ना शिरवार, पितांबर कश्यप, बलवीर गुरम, सुरेश गोलेवार, कुणाल रामटेके, राजू वासेकर, धर्मेंद्र तिवारी, राहुल चौधरी, संदीप सिडाम, सेवादल जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, वंदना भागवत, चंदा वैरागडे, शिल्पा आंबटकर, सागर वानखेडे, अंकुश तिवारी, कासिफ अली, एजाज़ भाई, सुनंदा धोबे, राज यादव, बंडोपंत तातावार, प्रकाश देशभ्रतार, सागर वानखेडे, सलमान खान, सूर्य अड़बोले, रिषभ दुपारे, गौस खान, उषा मेश्राम, कल्पना गिरडकर, अजय मोरे, दुशांत लाटेलवार, रवी रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.