दुबईत खेळणाऱ्या क्रिकेटर्सचे खासदार बाळू धानोरकरांनी केले कौतुक

भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर करणार आर्थिक मदत

चंद्रपूर : जिल्ह्यातील चार युवकांच्या भारत देशाबाहेरील दुबई या देशाच्या शारजहाँ येथे क्रिकेट खेळण्यासाठी निवड झाली. सर्व ८ नोव्हेंबरला रवाना होणार आहे. यामध्ये यगुराज् नायडू, रोहित नागपुरे, वंश मुनघाटे, संजय मेश्राम यांच्या समावेश आहे. आज भद्रावती येथे खासदार बाळू धानोरकर आणि भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यांना शुभेच्छा दिल्या. वंश मुनघाटे हा क्रिकेटपटू आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला जाणे शक्य होत नव्हते. हि बाब नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना माहित होताच त्यांनी आर्थिक मदत केली. आता या चारही क्रिकेटरचा शरजहाँ चा मार्ग मोकळा झाला आहे.

भद्रावती तालुक्यातील बराज तांडा हि अतिशय मागासलेली लोकवस्ती आहे. आईचे छत्र हरपलेल्या रोहित हा आजी – आजोबा, वडील व आपल्या लहान बहिणींसोबतच राहतो. त्याला लहानपणापासून क्रिकेट या खेळाची आवड आहे. वडील रवींद्र नागपुरे हे गवंडी काम करून परिवाराचे पालनपोषण करतात. अशाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रोहितने यशाचे शिखर गाठले. सर्वप्रथम क्रिकेटच्या ट्रायलकरीता हैद्राबादच्या उपल येथे निवड होऊन गोवा येथे निवड झाली. तेथे तो तीन मॅच खेळला. यामध्ये पाच गाडी बाद करून ‘प्ले ऑफ द मॅच’ द्वारे भ्रमणध्वनी संच प्राप्त केला. त्याने पाहिल्याच सामन्यांमध्ये चार गाडी बाद केले. तेथे खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये सरस रोहिल्यांने आता दुबई देशातील शारजहाँ येथे निवड झाली आहे.

त्यासोबतच जिल्ह्यातील नागभीड येथील येशूराज नायडू, वंश मुनघाटे, संजय मेश्राम व रोहित नागपुरे या चार युवकांचा दुबईकरिता निवड झाली. दुबईला जाण्यापूर्वी चार दिवस दिल्ली येथे सराव मॅच होईल, नंतर ते दुबई करीत रावण होणार आहे. सातासमुद्रापार निवड झाल्याने खासदार बाळू धानोरकर आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी कौतुक केले आहे. पुढील त्यांच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहे.