काँग्रेस करणार मानहानी सह फौजदारी दाखल
घुग्घुस : आदिवासी समाज बांधवाची खावटी (खाण्याचे साहित्य) वाटप हे दुर्गापूर येथिल आश्रमशाळेत होणार होते. आदिवासी समाज हा आर्थिकरीत्या मागासलेला असल्याने सदर खावटी वाटप घुग्घुस येथेच करावी अशी मागणी समाज बांधवानी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या माध्यमातुन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांना करण्यात आली सदर मागणी तातळीने मंजूर होऊन खावटी वाटप हे जिल्हा परिषद शाळा घुग्घुस येथे करण्यात आले.
समाज बांधवाच्या विनंतीवरून काँग्रेस अध्यक्ष पदाधिकाऱ्यान सह खावटी वाटप केंद्रा गेले तिथे विधिवत पूजा करून खावटी वाटपाचे उदघाटन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेने पार पाडले व यानंतर काँग्रेस अध्यक्ष पदाधिकाऱ्यांन सह स्व. हनुमंतु दिकोंडा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित झाले.
यानंतर शासकीय खावटी वाटप केंद्रावर भाजयुमो नेत्यांनी अधिकारी तसेच समाजबांधवाशी हुज्जत घालत वाद केल्याचे विडिओ व बातमी प्रकाशित झाली असे असतांना आताच एक्सप्रेसचे प्रतिनिधी देवानंद ठाकरे यांनी ” काँग्रेस अध्यक्षाचा पदाधिकाऱ्यांन सह पलायन “ अश्या स्वरूपाची धांदत्त खोटी बातमी लावली ही बातमी खोटी असून असे काहीच घडले ही वास्तविकता आदिवासी समाज बांधव व आदिवासी युवा नेते दीपक पेंदोर यांनी त्यांच्या बातमी खाली लिहले सदर कमेंट ही भांडाफोड करणारी असल्याने काँग्रेस कार्यकर्ते यांनी समाज माध्यमातून प्रसारित केले.
असता काही तथाकथित पत्रकारांनी पो. स्टे.ला कारवाई करिता तक्रार दिली.
या प्रकारनाची व बातमीची माहिती काँग्रेस अध्यक्षाना मिळताच त्यांनी संबंधित पत्रकारांना मोबाईल वरून माहिती घेतली असता आपण घटनास्थळी नसून आपण अन्य कुणाच्या सांगण्यावरून सदर बातमी प्रकाशित केल्याचे सांगितले असता खोटी बातमी लावून पक्षाची बदनामी केल्या प्रकरणी काँग्रेस तर्फे तथाकथित पत्रकारावर पाच लाखाची मानहानी व फौजदारी कारवाई करणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी स्पष्ट केले आहेत.