नेहरू महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सुहास रामचंद्र नेमाडे यांचे निधन

चंद्रपूरच्या वडगाव प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती सुहास रामचंद्र नेमाडे यांचे दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.या वयातही त्या वडगाव प्रभागातील गजानन महाराज मंदिर येथे नियमीत योगासनाचे मार्गदर्शन करीत होत्या.आज सकाळी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे डाॅ.पुणेकर यांच्या दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते.तिथेच दुपारी 1 च्या जवळपास उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

श्रीमती नेमाडे ह्या नेहरू शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सन 2001 पासून सुमारे 16 वर्षे सर्वोदय शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा दिली.इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून त्यांची विशेष ख्याती होती.

त्यांच्या मागे एक मुलगा,सुन व नाती असा आप्तपरिवार आहे.त्यांच्या मुलाचे कुटुंब विदेशात सिंगापूर येथे नोकरी निमित्त वास्तव्यास आहे.मुलगा चंद्रपूरला पोहोचल्यानंतर श्रीमती नेमाडे यांचेवर बिनबा गेट जवळील शांतीधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येईल.