लाल ‘परी’ ला घुग्घुस येथे चल यार धक्का मार…!

चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे अत्यंत आवश्यक साधन म्हणजेच महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस हिला आवडीने संपूर्ण महाराष्ट्रात लाल परी म्हणून संबोधल्या जाते.

मात्र सध्या या “लाल परी” ला घर – घर लागली आहे.
आज दुपारी दीड वाजता शहरातील राजीव रतन चौक रेल्वे गेटच्या मधातच G – 39 वर चंद्रपूर ते वणी जाणारी प्रवासी भरलेले MH 40 AQ 6392, MH 40 Y 5164 हे वाहन रेल्वे गेट वर बंद झाले.

यामुळे रेल्वेच्या दोन्ही मार्गाने वाहनांचे लांबच लांब रांगा लागल्या यामुळे नागरिकांची कोंडी झाली. या मार्गाने वेकोलीच्या कोळसा वाहतुकीचे वाहन दिवसभर ये – जा करीत असतात. या मार्गावर दिवसात पंधरा वेळा बंद पडतो यामुळे नागरिकांचे जीवनातील अनेक तास या रेल्वे क्रासिंग वर वाया जात आहे.

या गेट वर मागील अनेक वर्षांपासून उड्डाण पुलाची होत असलेली मागणी धूळ खात आहे. मात्र नागरिकांचे जीवघेणे प्रवास निरंतर सुरूच आहे.