July 11, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

पहिल्यांदा दारु तस्करीत महिला पोलीसांना सापडली

चंद्रपूर : घुग्घुस येथुन जवळच असलेल्या शेनगाव फाट्या दुचाकी क्र एम एच ३४ बीएन ६३६१ ने चंद्रपुर येथील रहिवासी असलेले एक महिला व तिचा साथीदार इसम हे पोत्यात दारु भरुन नेत दुचाकीने नेत असतांना वाटेतच घुग्घुस पोलीसांनी त्याना पकडले.

वणी तालुक्यातुन दुचाकीने बेलोरा पुल पार करत घुग्घुस मार्गे चंद्रपुरच्या दिशेने निघाले असतांना पोलीसांनी त्यांना बलोरा नदीच्या नाक्यावर थांबविले.
परंतु ते थांबले नाही पोलीसांनी पाठलाग करुन त्यांना शेनगाव फाट्या जवळ पकडले.
मुंगोली पुलाजवऴ रस्त्यावर जेसीबी ने खड्डा खोदुन हा बंद केला होता.एका पोलीस पाटलाच्या सहकार्याने वढा नदीच्या मार्गे चंद्रपुर या रस्त्याने मोठ्या प्रमाणात दारु तस्करी होत आहे.