July 11, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

उमा नदीमधुन मातीचे अवैध उत्खनन नदीत मोठमोठे खड्डे; महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष

  • चाौकशी करून कारवाई करू: तहसिलदार डि. जी. जाधव डोंगरगांव – रत्नापूर मार्गावरील नदीमधुन अवैध मातीचे उखननाबाबत चाौकशी करण्यात येणार आहे, चैकशीअंती उत्खनन करणाÚयावर कारवाई करून अशी प्रतिक्रिया दिली.

 

चंद्रपूर : मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत, सदर कामांसाठी रेतीची वाहतुकही मोठया प्रमाणावर सुरू आहे, तर डोंगरगांव ते रत्नापूर मार्गवर करोडो रूपये खर्च करून पुलाचे काम मागील 6 महिण्यापासुन सुरू आहे, त्याकामाच्या बाजुला मोठया प्रमाणावर नदीतुन मातीचे उत्खनन सुरू असुन मोठमोठे खड्डे पाडण्यात आले आहे मात्र याकडे महसुल विभागाचे पुर्णत्व दुर्लक्ष होत असल्याने महसुल विभागाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणी बंधाÚयांचे काम मोठया प्रमाणावर हाती घेतलेले आहे, अनेक पुल आणि बंधाÚयांचे काम पुर्णत्वातही आले आहे, यामुळे खरीप व रब्बी पिक घेण्यासाठी शेतकÚयांना सोईचे होणार आहे, मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरीकांच्या मागणीवरून मागील मंत्रीमंडळाने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे 23 कोठी रूपयाची निधी मंजुर करण्यात आली आहे आणि गेल्या सहा महिण्यापुर्वी पासुन कामाला सुरूवात करण्यात आले. सदर कामाचे पिल्लर उभे आहे. मात्र सदर कामाच्या बाजुने मोठया प्रमाणावर नदीमधुन पोकलॅंडव्दारे मातीचे उत्खनन सुरू आहे, नियमानुसार नदीतुन रेती अथवा मातीचे उत्खनन करता येत नाही, असे असतांनाही 4 ते 8 फुट खोल मातीचे उत्खनन करण्यात आले असून संपुर्ण माती त्याठिकाणाहुन हलविण्यात आली आहे, यामुळे नदीमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे, रेती तस्करीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणाÚया महसुल प्रशासनाने नदीतुन मोठया प्रमाणावर अवैध मातीचे उत्खनन करणाÚयांवर मेहरनजर का असा सवालही आता नागरीक करीत आहे.

◾शेकडो ब्रास मातीची चोरी

पोकलॅंडच्या माध्यमातुन हायवाने नदीतुन अवैध मातीचे उत्खनन व वाहतुक करणाÚयाकडे महसुल विभागाचे अधिकारी पुर्णत्व दुर्लक्ष करीत असल्याने माती तस्करांनी शेकडो ब्रास मातीचे उत्खनन करून वाहतुक केली आहे, यामुळे नदीमध्ये सर्वत्र खड्डे दिसुन येत आहे, यामुळे सदर तस्कारांनी लाखो रूपयाचा महसुल बुडविल्याची चर्चा परीसरात आहे, सदर माती तस्करावर कारवाई होणे गरजेचे आहे.

◾खड्डयामुळे अपघाताची शक्यता

मौजा डोंगरगांव येथील नदीघाटावरून मातीचे उत्खनन केल्यामुळे काही ठिकाणी 4 ते 8 फुटापर्यंत खड्डे पडलेले दिसून येत आहेे, पावसाळयात सदर खड्डे पाण्याने पुर्ण भरून जाऊ शकतो, परिसरातील नागरीकांना सदर खड्डे किती खोल आहे याची माहिती नसल्यामुळे एखादा नागरीकाचा याखड्डयात पडुन जिव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, विशेषतः ज्या ठिकाणी खड्डे खोदुन आहे त्याठिकाणच्या बाजुलाच स्मशानभुमी आहे, यामुळे याठिकाणी दहणविधीसाठी आलेल्या नागरीकांही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.