चंद्रपूर : जिल्ह्यात दिनांक ०२ मे २०२१ पासून खालील केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लस देण्यात येईल .
१ ) प्राथमिक शाळा , पोलिस स्टेशन समोर , ब्रम्हपूरी
२ ) रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा , रामनगर , चंद्रपूर
३ ) पंजाबी सेवा समिती , तुकुम , चंद्रपूर
४ ) नाट्य सभागृह , बल्लारपूर
५ ) समाज मंदीर , रामनगर , राजुरा
६ ) बुद्ध लेणी बिजासन , भद्रावती
७ ) जनता कन्या विद्यालय , नागभिड सदर केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येईल . दर दिवशी २०० याप्रमाणे प्रत्येक केंद्रावर लसीकरण करण्यात येईल .
सुचना :
• कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर जवळच्या १८ ते ४४ वर्षासाठी राखीव असलेल्या लसीकरण केंद्रावरच लस दिल्या जाईल .
• सर्व केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याने नागरीकांनी गर्दी करु नये .
• ज्या नागरीकांना लसीकरण सत्र उपलब्ध झाले आहे त्याच नागरीकांनी लसीकरणासाठी यावे .
• सदर केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर जावून गर्दी करु नये .
• १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्र राखीव असल्याने इतर वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणासाठी आग्रह करु नये .
• संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असल्याने केंद्रावर विनाकारण गर्दी न करता लसीकरण करणा – या टिम ला सहकार्य करावे .
• सदर राखीव लसीकरण केंद्रावर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरीकांना लस दिल्या जाणार नसल्याने या वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणाचा आग्रह धरु नये .