सायकल रॅलीने आझादीका अमृत महोत्सवाची सुरुवात

भद्रावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आझादीका अमृत महोत्सवाची सुरुवात सायकल रॅलीने व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाने होत असल्याची माहिती सहदिवानी न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी यांनी न्यायालयात घेतलेल्या एका बैठकीत दिली.रॅली सकाळी 8 वाजता न्यायालयापासून सुरू होऊन गांधी चौकात समाप्त होईल.रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका विधी सेवा समिती दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याव्यतिरिक्त वन्यजीव, स्वच्छता अभियान, कायदेविषयक मार्गदर्शन, बेटी बचाओ रॅली,विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन, ग्रामवासीयांना सात-बारा वाटप व जनजागृती कार्यक्रम, झोपडपट्टी वासीयांना कायदेविषयक माहिती अशा, आणि इतर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

हा महोत्सव पुढिल 45 दिवस चालणार आहे. त्यानिमित्त आयोजित बैठकीत उपस्थितांचे विचार ऐकून याव्यतिरिक्त ईतर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल असे न्यायाधीश कुळकर्णी यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी प्रथम श्रेणी न्यायाधीश दिपक एस. शर्मा, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.उदय पलिकुंडवार उपस्थित होते.