चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आणि लाेकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजुकर समाज माध्यमावर टाकणारे काॅंग्रेस कायकर्ते संदीम सिडाम याच्यावर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य शासनाने नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. यापार्श्वभूमीवर मुनगंंटीवार यांचा चेहरा दाखवून दारूला प्राेत्साहन देणारा व्हिडीओ समाज माध्यमावर पसरविला. मागील तीन दिवसांपासून हा व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहे. काॅंग्रेसचे कार्यकर्ते संदीम सिडाम यांच्या फेसबुक खात्यावरून ताे व्हिडिओ अपलाेड करण्यात आला हाेता.
सिडाम विराेधात भाजयुमाेचे शहर अध्यक्ष नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी वरुन पाेलिसांनी भादंवी ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.