दिवानी व फौजदारी न्यायालयातर्फे सायकल रॅली

भद्रावती : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आज आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कार्यालय तालुका विधी सेवा समिती व दिवाणी फौजदारी न्यायालय तर्फे आयोजित आयोजित करण्यात आले .या कार्यक्रमानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी ही सायकल रॅली न्यायालयापासून गांधी चौक येथे .गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायाधीश दिपक शर्मा, न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी ,बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड उदय पलीकुंडावार, मिलिंद रायपुरे, ए के तांबगडे आर एन पथाडे, के एन पथाडे एस एस भालेराव, पी एन ताठे ठेव , एम पी ठेंगणेआदी उपस्थित होते या सायकल रॅलीमध्ये गुरुदेव सेवा मंडळ ईको -पो, पतंजली योग समिती , नगर परिषद पत्रकार असोशियन तसेच इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.