नगर परिषद भद्रावती तर्फे कोरोना योद्धाचा सत्कार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भद्रावती : नगर परिषद भद्रावती तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात शहरातील कोराना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनिल धानोरकर नगराध्यक्ष, सूर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी, डॉ. निलेश खटके तहसीलदार , डॉ निलेश सिंग वैद्यकीय अधिकारी. दीपक शर्मा न्यायाधीश, चैतन्य कुलकर्णी न्यायाधीश, ऍड मिलिंद रायपुरे ,एस एस भालेराव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी विविध उद्भवणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यसादर करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी स्मशानभूमी येथील कर्मचारी, नगर परिषद सफाई कर्मचारी, आशा वर्कर, गुरुदेव सेवा मंडळ ,पतंजली योग समिती, इको प्रो ,पत्रकार असोशियन इत्यादी सामाजिक संघटनातील योगदान करणाऱ्या कोरोना योद्धांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.