राष्ट्रपिता नगर विकास मंचतर्फे गांधी जयंती साजरी

भद्रावती : राष्ट्रपिता नगर विकास मंच भद्रावती तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर सर्व धर्म पार्थना तसेच गांधीजी चे भजन के एस मनगटे यांनी सादर केले याप्रसंगी राष्ट्रपिता नगर विकास मंच चे धनंजय गुंडावार, डॉ प्रेमचंद , धर्मेंद्र हवेलीकर, विजय भोयर, प्रकाश दास, रवी पवार, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, विनायक येसेकर, शंकर आस्वले, बालाजी नागपुरे, रामू अण्णा, भाऊ कुटेमाटे, के एस मनगटे आदी उपस्थित होते.