चंद्रपूर : तालुक्यातील घुग्घूस येथे एका अल्पवयीन मुलाशी 45 वर्षीय आरोपीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. आरोपीविरोधात बाल लैगिक कायदा 8,12,18 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घुग्घूस मधील अमराई वार्ड येथे राहणारे अल्पवयीन मुले व्हाईट हाऊस जवळील पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याच्या टाकीत अंघोळ करीत असतांना आरोपी विनोद यादव (45) रा. घुग्घुस याने एका अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य केले. याची माहिती अल्पवयीन मुलाने आईला दिली.
मुलाच्या आईने घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैगिक कायदा 8,12,18 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. संजय सिंग करित आहे.