चंद्रपुरात आठ सिलेंडरचा स्फोट; तीन तासांपासून धगधगतेय आग

◆ आग आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न

चंद्रपूर : बल्लारपूर बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेल्या इमारतीच्या कामगार वस्तीत सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली. रात्री 9.30 नंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यावर इमारतीच्या 2 किलोमीटर वरील परिसर स्फोटाने हादरून गेल्याचे सागितले जात आहे. अद्याप जिवीतहाणी झाल्याचे वृत्त पुढे आले नाही.

घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे, अग्निशमन विभागाचे श्री. चोरे यांच्यासह फायर कर्मचारी दाखल झाले. अद्याप कोणतीही जीवित हानी समोर आली नसून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रपूर शहराच्या बंगाली परिसराला लागूनच पागल बाबा नगर आहे. याच परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज सुरू आहे.

या इमारतीचे कामकाज करण्यासाठी दोनशेवर कामगार कार्यरत आहे. यास इमारतीत कामगार राहतात. सायंकाळच्या सुमारास सायंकाळच्या सुमारास स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या गॅस सिलेंडरचे स्पोट झाल्याचे सांगितले जात झाले. आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अद्याप आग आटोक्यात आली नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही.