ताडोबातील चवताळलेल्या गजराज हत्तीने घेतला लेखापालाचा जिव

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोळसा प्रकल्पाचे एसीएफ थोडक्यात बचावले
• ताडोबा-अंधारी प्रकल्पातील बोटेझरी छावणीतील घटना

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी र छावणीत पर्यटन करिता असलेला गजराज नावाचं नर हत्ती आज गुरुवारी (6 मे) रात्रीच्या सुमारास अचानक चवथाळल्यामुळे त्यानी दोन अधिकाऱ्यावर हल्ला केला. यात मुख्य लेखापाल गौरकर यांचा मृत्यू झाला तर एसीएफ थोडक्यात बचावले आहेत ही घटना रात्री आठ वाजताचे सुमारास उशिरा बोटेझरी छावणी परिसरात घडली.

ताडोबा-अंधारी अभयारण्य राष्ट्रीय प्रकल्प पर्यटन करिता बोटेझरी छावणीत गजराज नावाचा नर हत्ती आहे. या ताडोबा-अंधारी राष्ट्रीय प्रकल्पात बोटेझरी परिसरात येणारे पर्यटक गजराजची शाही स्वारी करता. आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. परंतू सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे ताडोबा-अंधारी प्रकल्पात पर्यटनाच्या सर्व सुविधा बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचे येणे-जाणे महिनाभरापासून थांबलेली आहे. आज गुरुवारी ताडोबा-अंधारी प्रकल्पातील बोटेझरी छावणीत गजराज नावाचा नर हत्ती अचानक सायंकाळी आठवाजताचे सुमारास आक्रमक झाला. चवताळलेला हत्ती सैरभैर झाला.

अचानकपणे चवताळलेल्या गजराज हत्तीची माहिती कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आली नाही. याच परिसरात कोळसा प्रकल्पाचे कार्यालय आहे. कोळशा प्रकल्पाचे एसीएफ श्री कुलकर्णी आणि मुख्य लेखापाल (एफडी टीएटीआर) हे या परिसरात दोघेही वाहनाने दौरा करीत होते. त्यांचे वाहन चिखलात अडकले आणि जवळच आलेल्या हत्तीकडे पहात त्यांनी वाहन सोडले. चवथाळलेल्या हत्तीने दोघांवर हल्ला केला आणि दुर्दैवाने टीएटीआरचे मुख्य लेखापाल श्री गौरकर यांचा या घटनेत मृत्यू झाला. तर एसीएफ मात्र थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. या घटनेने ताडोबात गजराज चा थरार पहायला मिळत आहे.
रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पशुवैद्य आणि टीएटीआरचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि हत्तीला शांत आणि संयमित ठेवण्यासाठी रेस्क्यू करण्यात येत आहे. या भागातील खेड्यातील वास्तव्यास असणा-या नागरिकांना चवथाळलेल्या हत्ती बाबत सावध करण्यात आले आहे. हत्तीला पकडण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी ताडोबा अंधारी प्रशासनाचे वतीने सर्व प्रयत्न केले जात आहेत.

…यापूर्वीही गजराज घेतला होता महावत चा जीव

ताडोबा अंधारी प्रकल्पातील बोटेझरी छावणीत गजराज नावाचा नर हत्ती पर्यटकांकरिता करिता अनेक वर्षापासून कार्यरत आहे. 2019 मध्ये हत्ती यांना चालविणारा महावत जानीक मेश्राम याचाही जीव गजराजने अशाच पद्धतीने घेतला होता.