उद्या सोमवारी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने; एक हजार ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आता दंड थोपाटले आहे. काँग्रेस उद्या सोमवारी इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यातील एक हजार ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान तीन पेट्रोल पंपांवरही आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.

मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात उद्या सोमवार 7 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.