माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड

माजी आमदार निमकर व जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळॆ यांनी केले स्वागत; भाजपा च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित पदी निवड

राजुरा : महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती चे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीवर विशेष निमंत्रित पदी निवड झाल्याबद्धल दि.07.10.2021 ला राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

नुकतीच भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी घोषित झाली असून यात चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती चे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची निवड झाली असून या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर व भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले यावेळी महानगर महिला अध्यक्ष तथा माजी महापौर अंजली घोटेकर, राजीव गोलीवार, दत्तप्रसन्न महादणी व कार्यकर्ते उपस्थित होते.