कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना संस्थेच्या कोणत्याही शाखेत नि:शुल्क प्रवेश : डॉ. अशोक जिवतोडे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्यांना मदतीचा हात

डॉ. अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमीत्त जिल्हाभरात विविध उपक्रम

चंद्रपूर : सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व ओबीसी तथा विदर्भवादी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस आज (दि.११) ला विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही शाखेत नि:शुल्क प्रवेश देण्याचा निर्णय डॉ. अशोक जिवतोडे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमीत्त चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. वृध्दाश्रमात धान्यवाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्याला पुस्तक वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना मिठाई वाटप करण्यात आली.
विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. अशोक जिवतोडे यांना भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. पावसातही दिवसभर भेटणा-यांची रेलचेल सुरु होती. मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा झाला.