लखीमपूर शेतकरी हत्याकांडा विरोधात महाविकास आघाडी तर्फे घुग्घुस कळकळीत बंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : उत्तरप्रदेश येथील लखीमपूर (खैरी) येथे केंद्र शासनाच्या तीन काळ्या कायद्या विरोधात शांततेत आंदोलन करून घरी परत जात असताना भाजप नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना ठार केले. ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जवाबदारी आहे त्याच गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचा अमानुष हत्याकांड घडवून आणला.
आणि या नृशंस नरसंहाराला पाठीशी घालण्याचा पातक केंद्रातील मोदी शासन व उत्तर प्रदेश येथील योगी शासनाने केला. हत्याकांडातील आरोपींना बेड्या घालण्या ऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच अटक केली.

या हितलरशाही केंद्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा आवाहन केला होता. या आंदोलनाला प्रतिसाद देत घुग्घुस येथील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी एकत्रित येत घुग्घुस बंदचे आवाहन केले होते. या पक्षाच्या आवाहनाला व्यापारी वर्गांने सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात दुकाने उघडलीच नाही.

काही तुरळक प्रमाणात उघडलेल्या दुकानांनी महाविकास आघाडीचे बाईक रैली येताच आप – आपली दुकाने बंद केली. शहरातील चौका – चौकात आघाडीच्या नेत्यांनी मोदी व योगी शासनाचा निषेध व्यक्त केला.

सदर आंदोलन काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,
शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश बोंडे, बाळु चिकणकर, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे,गणेश शेंडे, तर राष्ट्रवादीचे सत्यनारायण डकरे, तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष मागास विभाग, इस्लाम अब्बासी, सतीश जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे किशोर बोबडे, निरंजन डंभारे, नुरुल सिद्दिकी, लखन हिकरे, प्रेमानंद जोगी, शेख शमीउद्दीन, इर्शाद कुरेशी, विशाल मादर, देव भंडारी, कपिल गोगला, शुभम घोडके, जुबेर शेख, विजय माटला, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, वस्सी शेख, आरिफ शेख, सुधाकर जुनारकर, योगेश ठाकरे, शिवसेनेचे बंटी घोरपडे, योगेश भांदकर, रघुनाथ घोंगळे, वेदप्रकाश मेहता, महेश शेंडे, लक्ष्मण बोबडे, शहंशाह शेख, निखिल मोहितकर, खुशाल जगताप, हर्षल बांदूरकर, सतीश गोहोकर, रेहांत शेंडे, विकी चिवंडे, सुरज खोंडे,
व राष्ट्रवादीचे बंडू झाडे, संजय भालेराव, कमाल उद्दीन, व मोठया संख्येने तीन ही पक्षाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.