गोंडपिपरी (चंद्रपूर) : भ्रमणध्वनीवरून आपला अपघात झाल्याची माहिती त्याने दिली. आप्तेष्ट बोलत असतांना अचानक बोलन बंद झाल. भ्रमणध्वनी सूरूच होता पण त्याचा अःतीम काळ आला.
चंद्रपूर गोंडपिपरी मार्गावरील आक्सापूरच्या हनुमान मंदीरालगतच्या टर्नींगवर नुकतीच अपघाताची हि घटना घडली. गोंडपिपरी येथील पंचशील वार्डातील विस्तारी इटकलवार वय 40 हा बसस्थानकावर चनेफुटाणे विकण्याचे काम करतो. तो मादगी समाज संघटनेचा तालुकाध्यक्ष होता. आज आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस होता. यानिमीत्ताने दुपारी तीन वाजता ते गोंडपिपरीत येणार होते. त्यांच्याकडे मादगी समाजभवनासाठी जागेची मागणी करण्यासंदर्भात तै निवैदन देण्याच्या तयारीत होता. आमदारांचा दौरा रद्द झाला. अन विस्तारी पुढील कामाला लागला.
काही कामानिमीत्त कोठारी मार्गाने गेला होता.
परत येत असतांना आक्सापूर मार्गावर असलेल्या टर्नींगवर त्याचा अपघात झाला.
यावेळी अपघातानंतर तातडीन त्यान आपल्या आप्तेष्टांना भ्रमणध्वनी केला. थोड्याफार संवादानंतर भ्रमणध्वनी सूरू होता. पण आवाज बंद झाला.
अपघातानंतर गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तपासणीदरम्यान डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केल. समाजासाठी धडपडणार्या चाळीस वर्षीय युवकाच्या अपघातात जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.