माऊंट एव्‍हरेस्‍ट सर करणा-या आदिवासी विद्यार्थ्‍यांना नोकरी मिळण्‍याबाबत विधानसभेत शासनाचे लक्ष वेधणार – आ. सुधीर मुनगंटीवार

0
28

जिवती येथे महिलांच्‍या लक्षणीय उपस्थितीत तेजस्विनी महिला जागर सम्‍मेलन संपन्‍न

चंद्रपूर : राज्‍यात भाजपाची सत्‍ता असताना जिवती नगर पंचायत क्षेत्रातील अनेक योजनांसाठी, विविध विकासकामांसाठी आम्‍ही निधी उपलब्‍ध केला. या भागातील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍टसारखे उंच शिखर सर करत मिशन शौर्य यशस्‍वी केले. आम्‍ही या विद्यार्थ्‍यांना पोलिस विभागात नोकरी देण्‍याचे ठरविले होते, मात्र हे विद्यार्थी अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. येत्‍या विधानसभा अधिवेशनात आपण या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जिवती येथे भाजपा महिला आघाडीतर्फे मकर संक्रांतीनिमीत्‍त आयोजित तेजस्विनी महिला जागर सम्‍मेलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, विजयालक्ष्मी डोहे, जि.प. सदस्‍या गोदावरी केंद्रे, कमलाबाई राठोड, तालुकाध्‍यक्ष केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, सुनंदा राठोड, सुनिल मडावी, माधव कुळसंगे, फरीद शेख, लक्ष्‍मीबाई आगलावे, वर्षा गुरमे, मनिषा नंदगिरवार, पार्वताबाई गव्‍हारे, शिला चव्‍हाण, अमृतवर्षा पिल्‍लेवाड, राजेश राठोड यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, १५ ऑगस्‍ट २०२२ ला देशाच्‍या स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. आजही महिलांवर मोठया प्रमाणावर अन्‍याय, अत्‍याचार होत आहेत. महाराष्‍ट्रात या घटनांमध्‍ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नारीशक्‍तीने एकत्र येत अन्‍यायाविरूध्‍द लढा देण्‍याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारने महिलांच्‍या कल्‍याणासाठी अनेक योजना राबविल्‍या आहेत. या योजना प्रत्‍येक महिलेपर्यंत पोहचाव्‍या यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाला जिवती येथील महिलांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here