चुनाळा ग्राम पंचायतीमध्ये हिवरे बाजार सरपंच पदाचे पॅटर्न

0
268
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सात महिलांनी केला सरपंच पदाचा त्याग
• नागरिकांनी केला बाळूनाथ वडस्कर यांच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब

चंद्रपूर : निवडणूक म्हणजे आर्थिक घोडेबाजार मग ती लोकसभेची असो की, ग्रामपंचायतीची निवडणूक मतदारांना आपल्याबाजूने मतदान करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब होत असतो, नको ते स्थरावर जात असतात मात्र राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकीक असलेल्या चुनाळा ग्रामपंचायत येथील आज (दि. १२) झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत तेरा सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांपैकी सात महिलांनी हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे पॅटर्न राबवित चुनाळा येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच व समाजसेवक बाळनाथ वडस्कर यांच्यावर विश्वास ठेवत सरपंच पदाकरिता एकही आवेदनपत्र न भरल्याने व उपसरपंच पदासाठी एकमेव बाळनाथ वडस्कर यांचीच बिनविरोध निवड केल्याने हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांचे धर्तीवर बाळनाथ वडस्कर यांच्याकडे गावाचा कारभार दिला आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी काम पाहिले
चुनाळा येथील जनतेनी या निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवीत येथील जनतेनी एकतर्फी कौल देत 13 पैकी 13 उमेदवार निवडून दिले व आम्हाला बाळू हाच सरपंच पदी पाहिजे आहे असा आग्रह धरला मात्र सरपंच पदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाल्याने नागरिकांचा प्रशासनाप्रति रोष निर्माण झाला व पाचशे महिला पुरुष तहसिलवर धडकून ताहासिलदाराचा सरपंच पदाचे आरक्षण बदलविण्यासंबंधी निवेदन दिले परंतु प्रशासनाकडून काहीच बदल न झाल्याने व निवडून आलेल्या सात महिला व गावातील नागरिकांनी हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांच्या धर्तीवर सरपंच पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याने चुनाळावासीयांनी जल्लोषात बाळूचे स्वागत केले.

चुनाळा गावात कोणत्याही ग्रामपंचायतीच्या मालकीचे नसतील ते विश्रामगृह असून सात एकरच्या परिसरात सागवान वृक्ष असून करोडो रुपयाची संपत्ती आहे, ग्रामपंचायतीचे पहिले सचिवालय तयार करून गावातील सर्व कार्यालये पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बँक, ग्रामपंचायत त्या इमारतीत आहे, स्वतंत्र सभागृह असून गावातील सामाजिक कार्यक्रम व वैक्तिक कार्यक्रम करण्यास सोईचे आहे, गावात पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहे, शेतात जाण्यासाठी पांदन रस्त्याची सुविधा असून याच विकास कामावर विश्वास ठेवीत काम करण्याऱ्या माणसालाच सरपंच पदी रुजू करण्याचा निर्णय जनतेनी घेतल्याने बाळू व ग्रामपंचायत सदस्य संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर, दिनकर कोडापे, राजू कीनेकर, राकेश कार्लेकर, रवी गायकवाड, सचिन कांबळे यांचे गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.