अवैध दारूविक्रीसाठी लाच मागणा-या सहायक पोलिस निरीक्षकासह शिपायाला अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ गोंडपीपरी तालुक्यातील लाठी उपपोलीस ठाण्यातील घटना

चंद्रपूर : अवैध दारूविक्री करण्यासाठी मागणाऱ्या  जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील लाठी उपपोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपायाला पोलिसांना चंद्रपुर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 29 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर, शिपाई संजू रतनकर असे लाचखोर पोलिसांचे नाव आहेत.

गोंडपीपरी तालुक्यातील लाठी परिसरात अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी लाठी येथील काही पोलीस कर्मचारी 18 हजार रुपये महिना देण्यासाठी पैशाचा तगादा लावत होते.व दोन महिन्याचे 36 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही आरोपीना29 हजार 500 रुपयांची लाच घेताना अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.