घुग्घूस (चंद्रपूर) : जेम – तेम तीन महिण्यापूर्वी 03 नोव्हेंबर 2020 रोजी घुग्घूस शहरातील व्यवसायिक सनी खारकर यांच्या सात वर्षीय मुलगा वीर खारकर यांचे भर दिवसा अपहरण करण्यात आले.
मात्र सोशल मीडियावर नागरिकांनी केलेल्या जनजागृती तसेच पोलिसांच्या दक्षतेने वीर बचावला पैश्यासाठी एका निरागस बालकाचे अपहरण करणाऱ्या विकृत गणेश पिपळशेंडे याला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती जेणेकरून गुन्हेगारा मध्ये कायदयाची जरब निर्माण झाली असती आणि परत असे गुन्हे करण्यास आरोपीचे धाडस झाले नसते मात्र एवढया मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला सहानुभूती दाखविण्यात एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला त्यापैकी एका भारदस्त नेत्यांनी त्यांची जामीन ही घेतली.
यामुळे आरोपीचे मनोबल बळावले आपण परत गुन्हा केल्यास आपल्याला वाचविण्यासाठी सशक्त लोकांची
एक पूर्ण टीमचं आपल्या पाठी मागे असल्याने यावेळी ही आपण सुटून जाऊ कदाचित हीच भावना मनात ठेवून त्याने एकलुत्या एक शुभमचा अपहरण केला.
पैशे तर भेटले नाही आणि आपले बिंग फुटणार या भीतीने विकृत मानसिकतेच्या गणेश पीपळशेंडे याने 25 वर्षीय शुभमचा निर्घृणपणे हत्या केली.
जेव्हा जेव्हा अश्या गुन्हेगारांना पाठीशी घालन्यात येते तेव्हा तेव्हा गुन्हेगारी कमी होण्यापेक्षा वाढतच जाते ?
आज जे नक्राश्रू गाळून पुढे – पुढे करीत आहे.
वीरच्या अपहरण प्रसंगी हे मागे हटले असते तर आज विकृत गणेश पीपळशेंडे हा तुरुंगात असता आणि शुभम जिवंत असता ?
