चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषदेच्या हद्दीत दिवसागणिक कोरोना संक्रमित रुगणाची संख्या झपाट्याने वाढत असून आज बुधवारी (14 एप्रिल) रोजी 34 कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले असून केमिकल वॉर्ड क्रं.06 मधील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घुग्घूस वासीयांना सावधान होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हातधुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रीसुत्रींचा नियम पाळावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
आज रात्री पासून ब्रेक द चैन अंतर्गत 30 एप्रिल पर्यंत कडक लॉकडाउन लागण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना बाहेरजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंधरादिवसाच्या कालावधीत ब्रेक दी चैन करून कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. दरदिवशी वाढणारे रूगण लक्षात घेता घुग्घूसवासीयांनी सावधगिरी बाळगावी असे सांगण्यात आले आहे.