परीसरातील जनतेने मोठ्या संख्येने या सप्ताहाचा लाभ घ्यावा – देवराव भोंगळे
घुग्घूस : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान युगपुरुष नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या विशेष मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा सप्ताह सेवा व समर्पण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहात विविधांगी सेवेचे कार्यक्रमांबरोबर ५७१ रुग्णांना चष्मेवाटप, २७१ जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, ७१ लाभार्थ्यांना नविन राशन कार्डचे वाटप, १७१ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, ७१ लाभार्थ्यांना जनधन पासबूक खात्याचे वितरण, शहरातील ७१ फेरीवाल्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, ७१ गरजू नागरिकांना ब्लॅन्केटचे वाटप, ७१ गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप, ७१ कोरोणा योद्ध्यांचा सत्कार तर ७१ बचत गटांचा कर्ज मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी घुग्घुस शहरातील नागरिकांसह परीसरातील जनतेने मोठ्या संख्येने या सप्ताहाचा लाभ घ्यावा. असे आवाहन माजी सभापती नीतू चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय तिवारी, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी सरपंच संतोष नूने, ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, सिनु इसारप, प्रकाश बोबडे, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, हसन शेख, रत्नेश सिंह, मल्लेश बल्ला, सुनील राम, पुनम शंकर, महेश लट्टा, महेंद्र साठे, पूजाताई दुर्गम, कुसुमताई सातपुते, नंदाताई कांबळे, वैशालीताई ढवस, सुचिताताई लुटे, सुषमाताई सावे, लक्ष्मिताई चांदेकर, कविताताई आमटे यांनी केले आहे.