शासकीय वैद्यकीय महाविदयालयात 10 वेंटीलेटर तर 14 आॅक्सिजन बेडची उपलब्धता

• आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर गोरगरीब रुग्णांसाठी व्यवस्था
• महाविद्यालयातील उपाय योजनांची पाहणी, उर्वरीत बेडचे काम युध्द स्तरावर करण्याच्या केल्या सुचना

चंद्रपूर : कोरोनाच्या महामारीत वेंटीलेटर व आॅक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. खाजगी रुग्णालयातील खर्च परवडण्यासारखा नसल्याने सर्व समान्य कुटंुबातील रुग्णांचे मोठे हाल होत आहे. हे लक्षात घेता आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात येथील आॅक्सिजन व वेंटीलेटर बेडचे काम सुरु करुन घेतले आहे. त्यामूळे आज रविवारी रात्री पर्यंत येथील 10 वेंटीलेटर व 14 आॅक्सिजन बेड गोर गरिब रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डाॅ. बंटी रामटेके, डाॅ. किन्नाके आदिंची उपस्थिती होती.

कोरोना काळात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दिशेने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यांनी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी नुकताच मनपाला 1 करोड रुपयांचा निधी दिला आहे. त्यामूळे येत्या काही दिवसात महानगर पालिकेचेही सर्व सोयी सुविधा युक्त कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. दरम्याण आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविदयालयाला पुन्हा एकदा भेट देत उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी येथे वेंटिलेटर व आॅक्सिजन बेड सुरु करता येईल इतके साहित्य उपलब्ध असल्याचे दिसून आले. मात्र तांत्रिक अडचणीमूळे हे काम रखळले होते. हे लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर एजन्सीला येथे बोलावून वेंटीलेटर व आॅक्सिजन बेडचे काम सुरु करुन घेतले आहे. हे काम युध्द स्तरावर सूरु असून आज रविवारी रात्री पर्यंत येथील 10 वेंटीलेटर व 14 आॅक्सिजन बेड सुरु करण्यात येणार आहे. त्यामूळे सर्व सामान्य कुटंबातील रुग्णांना थोड्या प्रमाणात का हाई ना मोठा दिलासा मिळणार असून उर्वतरीत इतर बेडही सुरु करण्याच्या दिशेने वेगवान प्रयत्न करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. चंद्रपूरातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी स्वताच्या जिवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणीक प्रयत्न करत असल्याचे सांगत आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले असून अशा कठीण परिस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिका-यांचे मनोबल वाढविणे गरजचे असल्याचेही सांगीतले आहे.