चंद्रपुरात अडीच कोटींचा “ऑक्सीजन प्लांट” बंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ऑक्सिजन अभावी जात आहेत जीव

चंद्रपूर : कोरोनाचे डबल म्युटेशन होत असताना आरोग्य व्यवस्थेचे पूर्णता धिंडवडे उडाले आहेत. चंद्रपुरातही ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे लोक कसे मरतात याचं उदाहरण समोर आले आहे. ऑक्सीजन बेड आणि व्हेंटिलेशन बेडची कमतरता देखील जाणवत आहे. मात्र सहा महिन्यापूर्वी चंद्रपुरात अडीच कोटी खर्च करून सहाशे बेड आॅक्सीजन पुरवठा क्षमतेचे आॅक्सीजन प्लांट बंद असून धूळखात आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 600 बेड ऑक्सिजन पुरवठा करता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन प्लांट ची निर्मिती करण्यात आली. यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आजही चंद्रपुरात हा प्लांट बंद अवस्थेत धूळखात पडला आहे.

जनतेच्या खिशातले अडीच कोटी रुपये खर्च तर झाले मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन ची गरज असताना चंद्रपूरकरांना ऑक्सिजन मिळत नाही ही चंद्रपुरकरांसाठी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. चंद्रपुरात लोक ऑक्सिजन बेड मिळत नाही म्हणून वेगवेगळे दवाखाने फिरत आहेत याशिवाय चंद्रपूर ते तेलंगणा आणि तेलंगणा वरून परत चंद्रपूर गिर्ट्या घालत आहेत. अनेकांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे फुटपाथवर पडून उपचार करावा लागत आहे. आणि सिरीयस पेशंटला ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे तिथेच आपला जीव सोडावा लागत आहे.
चार आठवड्यात सुरू होऊ शकणारी ऑक्सिजनची यंत्रणा सहा महिने लोटून देखील सुरू होऊ शकत नसेल तर हे राजकारणी पुढाऱ्यांचे अपयशच समजावे काय असा नागरिकांना पडला आहे.