वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोना महामारी संकटात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना कोविड मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना 50 लक्ष सानुग्रह सहाय्य देण्यात यावे व अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील वारसदारांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शासनाकडे केलेली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना ऑनलाइन निवेदन पाठविले आहे.

कोवीड -१ ९ संबधित कर्तव्य बजावताना कोवीड मुळे मृत्यु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रू . ५० लक्ष सानुग्रह सहाय्य लागु करण्याचे आदेश दिनांक १ ९ / ०५ / २०२० च्या शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आले आहे व त्यास ३०/०६/२०२१ पर्यंत मुदत वाढ सुध्दा देण्यात आलेली आहे . संपूर्ण राज्यामध्ये कोविड -१ ९ च्या नियंत्रणासाठी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहे . अनेक शिक्षकांना कोविड -१ ९ ची बाधा होऊन मृत्यु देखील झालेले आहे . त्यामुळे कुटुंबातील आधार गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अश्या सर्व शिक्षक व कर्मचारी कुटुंबातील वारसदाराना ५० लक्ष सानुग्रह अनुदान लागु करण्यात यावे व त्यांच्या वारसानाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी .
अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागु असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड १ ९ मुळे निधन झाल्यास त्यांना अल्प प्रमाणात निवृत्तीचे लाभ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे . त्यामुळे कार्यरत कोणत्याही शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा कोविड -१ ९ मुळे मृत्यु झाल्यास त्यांना सरसकट रक्कम ५० लक्ष रूपयाचे सानुग्रह सहाय्य मंजुर करण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे .