त्या कामगारांचे तासभरात झाले पगार !

• न्यूज पोस्ट च्या वृत्ताचा दणका
• त्या कामगार नेत्याचे प्रयत्न सार्थकी ठरले

चंद्रपूर : घुग्घुस येथील एसीसी सिमेंट वर्क्स येथील न्यू पॅकिंग प्लांटचे ठेकेदार नितीन शर्मा यांनी या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना त्याच्या केलेल्या कामाचा मोबदला दिलेला नव्हता. या बाबत राष्ट्रवादी सिमेंट मजदूर संघटनेचे कामगार नेते सैय्यद अनवर यांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. या बाबत न्युज पोस्ट पोर्टलवर बातमी प्रकाशित करण्यात आली. या बातमीची दखल कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदाराने घेवून तासभरात सदर कामगारांचे पगार दिले आहे.
एसीसी कंपनीचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखीला होत असतो मात्र नितीन शर्मा हे नेहमीच वेतन देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याचे ही माहिती कामगारांनी कामगार नेते सैय्यद अनवर यांनी दिली.

कामगार नेते यांनी कामगारांचे वेतन तातडीने देण्यासंदर्भात कंपनीला सुचविले अन्यथा कोरोना काळात कामगार हितासाठी आपण रस्त्यावर उतरू असा सज्जड दम कामगार नेत्यांनी दिला होता. सदर कामगाराचा इशारा आणि न्युज पोस्ट च्या वृत्ताची दखल घेत कामगारांचे पगार देऊया प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.