चंद्रपूर : अमलनाला धरण पूर्ण भरून वेस्ट वेअर सुरु झाला तेव्हा पासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. धबधाब्यावर जाऊन विहंगमय दृश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत आहेत, सुट्टी च्या दिवशी तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, पाण्यात भिजून मनसोक्त आनंद लुटतात, मात्र अतिउत्साहीपणामुळे एका महिन्यात 3 युवकांना जलसमाधी मिळाली.
14 सप्टेंबर ला 2 युवकाचा बुडून मृत्यू होताच प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ 15 सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सिंचाई विभागाचे अभियंता सय्यद अमीर, यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांना दुर्घटना स्थळी जाण्यासाठी बंदी घातली व तशा प्रकारचे फलक पोलीस प्रशासन ने लावले. लगेच दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाने प्रतिबंध दर्शविणारे बोर्ड लावले.











