गणपती जेवणाच्या वादातून इसमावर चाकूने हल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या आरोपी महेंद्र कीर्तिदास सेनापती (22) याने भीम दीप यांच्याशी गणपतीच्या जेवणावरून वाद घातला व शिवीगाळ करून चाकूने पोटावर वार करून जखमी केले.

ही घटना गुरुवारी 16 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता सुमारास घडली.

फिर्यादी संजोक्ता भीम दीप (49) यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी 324, 504 गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीस सूचनापत्र देऊन सोडले आहे. पुढील तपास पोहवा. बंडू मोरे करीत आहे.