राजिव रतन कोविड रुग्णालयात आणखी 24 खाटा वाढवा : आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचना

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• घुग्घूस येथील कोविड रुग्णालयाची पाहणी, उपाय योजनांचा घेतला आढावा

चंद्रपूर : घूग्घूस येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी वेकोलीतर्फे सुरु करण्यात आलेल्या राजिव रतन कोविड रुग्णालयातील सोयी सुविधांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत येथील उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी येथे आणखी 24 खाटा वाढविण्यात याव्यात अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या असून कठीण काळात मदतीचा हाथ देत उत्तम उपायोजनांबाबत वेकोलिच्या अधिकारी कर्मचारी यांचे कौतूकही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यावेळी वेकोली महाप्रबंधक उदय कावळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आनंद, डाॅ. शंभरकर, सबेरीया मॅनेजर किसरोडी, क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक ब्रिजेश कुमार, यांयासह यंग चांदा ब्रिगेडचे प्रेम गंगाधरे, राजीव नाथड यांची यावेळी आदि उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरासह घूग्घूस येथेही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामूळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारा करिता चंद्रपूरात येत असल्याने येथील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता तसेच रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता घूग्घूस येथील वेकोलीचे राजीव रतन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी सुुरु करण्यात आले आहे. दरम्याण आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रुग्णालयाला भेट देत येथील सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी येथील बेड, औषधसाठा, याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या 24 खाटांचे हे रुग्णालय असून यात वाढ करुन आणखी 24 खाटा येथे सुरु करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्या आहे. हे रुग्णालय घूग्घूस वासीयांसाठी आशेची किरण असून येथे येणा-या रुग्णांचे सामाधान होईल अशी व्यवस्था उभी करावी अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. रुग्णालयात स्वच्छता पाळणात यावी, रुग्णांना योग्य वागणूक देण्यात यावी, उपचार करत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातलगांना देण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी, यासह अनेक महत्वाच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनाला केल्यात. तसेच पाहणी दरम्याण येथील उत्तम नियोजना बाबत वेकोलि अधिका-यांचे कौतुकही केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील लसीकरण केंद्रालाही भेट देत लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत लस घेत असल्याबदल त्यांचे अभिनंदन केले. लस घेण्यासाठी येणा-या नागरिकांसाठीही योग्य व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.