काँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते नवीन कारपाका यांचा आज रुग्णालयात नेत असतांना दुःखद निधन झाले. मागील तीन चार दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने आज ते रुग्णालयात जात असतांना त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटूंबियांवर दुःखांचे आभाळ कोसळले आहेत.

त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, व संपूर्ण काँग्रेस परिवारा तर्फे त्यांना साश्रुनयनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.