चंद्रपूर : शहराच्या उत्तर बाजूला हॉटेल ट्रायस्टारपासून- ताडोबा रोड-लॉ कॉलेज-मुल रोडपर्यंतचा ६० मीटर रूंदीचा व सुमारे ५ किमी लांबीचा विकासयोजना बाहृयवळण रस्ता विकास आराखडयातून वगळून त्या खालील जागा निवासी प्रभागात समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात लॉ कॉलेज ते नेहरू नगर पर्यंतच्या रस्त्याचे मोजमाप करून किती मीटर रूंदीचा रस्ता होवू शकतो ते मनपा आयुक्तांनी ७ दिवसात कळवावे, असे निर्देश प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिले. लॉ कॉलेज ते हॉटेल ट्रायस्टार हा रस्ता पूर्ण वगळण्यात येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला अंतिम मंजूरी येत्या १५ दिवसात देण्यात येणार आहे. या सर्व प्रकाराचा आम आदमी पार्टी, चंद्रपुर विरोध करीत आहे.
चंद्रपूर चा रिंग रोड पूर्ण होणे हे चंद्रपूरकरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक निवडणुकीत रिंगरोड ला निवडणुकीचा मुद्दा बनवून निवडणूक जिंकल्या जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनीही अशीच घोषणा केली होती. एकीकडे लोकांना घरे बांधा नंतर काय ते बघून घेवू म्हणून प्रोत्साहन द्यायचं. निवडणुकीच्या तोंडावर त्या घरांना सुरक्षेची हमी देवून खोटी लोकप्रियता मिळवायची, विधानसभा निवडणुकीत निधी उपलब्ध करून जि घरे रींगरोड मध्ये आडवी येणार तिथे ऊंच काॅलम घेऊन घर न हटविता रिंगरोड बनविणार असे आश्वासन द्यायचे, आणी आता पळवाट काढायची, अशा दुटप्पी धोरणामुळे चंद्रपूर शहरामधील रिंगरोड वर्षानुवर्षे लांबणीवर पडत आहे.
माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या “रिंग रोड विकास आराखड्यातून वगळणार” या वक्तव्यावरून चंद्रपुर च्या रस्तेविकास व रहदारीच्या विभाजनाला हरताळ फासल्या गेले असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष सुनील मुसळे यांनी सांगितले.
1) रिंगरोड या नियोजित मुद्द्याला रद्द करणाऱ्या नेत्याला चंद्रपूरकर विकास पुरुष म्हणतील का?
                  2) 700 घरांचा प्रश्न सोडविण्या ऐवजी 90000 मालमत्ता धारकांना अपघाताच्या धोक्यात घालतील का?
                  3) जिथे घरे झालेली आहे तिथे घरांना धक्का न लावता पिल्लर उभारून फ्लाय ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा.
                  4) जिथे घरे झालेली नाही तिथे खाली जागेवर रिंग रोड तयार करण्यात यावा. ज्यामुळे रिंग रोड तयार होईल , व जनतेचे नुकसान होणार नाही.
जुना कुंदन प्लाझा म्हनजे आताचे ट्रायस्टार हॉटेल ते लॉ कॉलेज – बंगाली कॅम्प पर्यंत होणारा रिंगरोड अनेक वर्षांपासून झालेला नाही. यामुळे राज्यमहामार्गावरील वाहतूक ट्रायस्टार हॉटेल-सिव्हिल लाईन वरोरा नाका चौक, ते बंगाली कॅम्प अशी चंद्रपूर शहरातून जात असल्याने अनेक अपघात झालेले आहे. सरसकट रिंगरोड विकास आराखड्यातून वगळल्यास अपघाताची संख्या खूप वाढेल, अशी भीती आहे. चंद्रपूर शहर महानगर पालिकेमध्ये सतत 10 वर्षांपासून भाजप ची सत्ता आहे. सुधीर मुनगंटीवार हे स्वतः वित्त मंत्री होते. तेव्हा या रिंगरोड साठी निधी उपलब्ध करून द्यायला ते विसरले. आता मात्र रिंगरोड रद्द करून चंद्रपुरकरांच्या भावनेशी खेळणे सुरु आहे, अशी खंत सुनील मुसळे यांनी व्यक्त केली.
 
                                          
                                          
                                          
                                          
                                          



                                          
                                          
                                          
                        

