वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील २६ वर्षीय युवकाने ब्रह्मपुरी आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास घडली होती. दोनदिवसांनी त्याचा मृतदेह ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आला आहे. लंकेश दिघोरे असे मृताचे नाव आहे. सदर युवक मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर युवकानी मोटार सायकल वैनगंगा नदीवरील पूलावर आढळून शोधाशोध केल्याने दोन दिवसांनी मृतदेह आढळून आला आहे.

प्राप्त माहिती अशी की, सदर युवक गांगलवाडी टी पॉईंट जवळील पाचगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर नोकरी करीत होता. सदर युवक 21 आक्टोबर ला दुपारी तीनच्या सुमारास घरून ड्युटीवर निघून गेला मात्र नेहमीच्या वेळेप्रमाणे तो घरी परतला नाही. कुटुंबातील लोकांनी लंकेशच्या मोबाईल फोन केला मात्र तो स्विच ऑफ दाखवत असल्याने घरच्यांची आणखी चिंता वाढली. काही व्यक्तींना त्याची मोटार सायकल वैनगंगा नदी पुलावर आढळून आल्याने ब्रह्मपुरी ठाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार करण्यात आली. दोन दिवसापासून घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर सदर युवकाचा मृतदेह ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडे सावली व गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, 2 महिन्याचे बाळ आई असा परिवार आहे.