मराठी शाळा मोडकळीस आणण्याचा डाव : सरकार्यवाह सुधाकर अडबाले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राजुरा येथे सहविचार सभा.. योग्य उमेदवार सभागृहात पाठवण्याचे आवाहन

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनीधी मागील दहा वर्षापासून नसल्यामूळे शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न, वेतन सातत्याने उशिरा होणे, विनाअनुदानित शाळांना अनुदान, जूनी पेंशन योजना, अतिरीक्त शिक्षकांच्या  अनेक समस्या प्रलंबित आहेत. भविष्यात मराठी शाळा मोडकळीस आणण्याचा कुटील डाव सरकारचा आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी एकसंघ होऊन लढा देणे गरजेचे आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण क्षेत्राची जाण असणारा उमेदवार सभागृहात पाठविण्याचे आवाहन सुधाकर अडबाले यांनी राजुरा येथे केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ राजुरा यांच्या वतीने आयोजित सहविचार सभेत श्री अडबाले  बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष ताजने होते तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळ, मुंबई चे   सहकार्यवाह जगदीश जुनघरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे  सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष

लक्ष्मण धोबे,प्राचार्य सुधाकर उईके, देवराव निब्रड, दीपक धोपटे, मसुद अहमद, मुख्याध्यापिका छाया मोहीतकर, इंदीरा येवले मुख्याध्यापक सुधाकर उईके, के.टी.डांगे, मोरेश्वर थिपे,आनंदराव मत्ते, प्रभाकर बोबाटे, बोबडे , जांभुळकर , प्रभाकर उईके, भास्कर ठावरी, नाना डाखरे, पर्यवेक्षक वसंत पोटे, राजू डाहुले ,आनंद चलाख, यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीहरी शेंडे, केशव ठाकरे यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची वाटचाल व न्याय हक्कासाठी केलेले आंदोलन यावर माहिती दिली.

प्राचार्य डॉ. संभाजी वारकड यानी सरकार्यवाह सुधाकर अडबाले  यांच्यासारख्या नेतृत्वाची सभागृहात गरज असल्याचे विशद केले आणि सर्व शिक्षकाना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडवले यांना निवडून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सुभाष शेंडे यांनी केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राजू डाहुले यांनी केले. आभार तालुका कार्यवाह आनंद चलाख यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.