अपघातात मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबियांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आर्थिक मदत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

संचालिका सुचित्रा ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकरी कल्याण निधी अंतर्गत रूई येथील अपघातात मृत्यू झालेले अरुण राऊत ह्यांच्या पत्नी आशा राऊत यांना आर्थिक हातभार लागावा ह्या हेतूने 10 हजार रुपयांचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालीका सुचित्राताई ठाकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

ब्रम्हपुरी तालुक्यातील रूई येथील रहिवासी असलेले अरूण राऊत हे आपल्या दुचाकीने आरमोरी येथे जात असतांना 13 सप्टेंबर रोजी अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती मृत्यू पावल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या आई, पत्नी, व दोन मुले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना आता आर्थिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत सदर कुटुंबीयांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे प्रस्ताव सादर केला.

त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालीका सुचित्राताई ठाकरे यांच्या पुढाकाराने सदर प्रस्ताव तात्काळ मंजूर करून सदर कुटुंबीयांना धनादेश वितरित करण्यात आला. धनादेश वितरित करतांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालीका सौ. सुचित्राताई अण्णाजी ठाकरे, अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब, रूई येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम बनकर, उपसरपंच ज्ञानेश्वर बुल्ले, माजी सरपंच तुलाराम कार, पुंडलिक नाकतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गांगलवाडी शाखेचे व्यवस्थापक प्रशांत इनमुलवार, बॅंक निरीक्षक ढोक हे उपस्थित होते.