चंद्रपूर : भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या माजरी क्षेत्राच्या अध्यक्षपदी गजानन निमकर तर सचिवपदी महेश श्रीरंग यांची निवड करण्यात आली.भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरीच्या वतीने वार्षिक अधिवेशन शुक्रवारी (ता. २२) सामुदायिक मनोरंजन केंद्र कुचना येथे पार पडले.
यावेळी उद्घाटक म्हणून भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे, प्रमुख अतिथी अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घूरडे, अ.भा.ख. मजदूर संघाचे उपाध्यक्ष शिवदयाल बिसन्दरे, अशोक मिश्रा, सुनील मिश्रा, अनंतकुमार गुप्ता, जयंत आसोले आदींची उपस्थिती होती. या अधिवेशनात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या माजरी एरिया अध्यक्षपदी गजानन निमकर तर सचिवपदी महेश श्रीरंग तर भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या वणी-माजरी अध्यक्षपदी चंद्रप्रकाश रहागंडाले, महामंत्रीपदी जनार्धन जेणेकर यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मजदूर संघाला अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संजीव बावणे, नानाजी महाकुलकर, गायकवाड, मोरेश्वर आवारी, विवेक पालके, डॉ. हाेमेंद्र तुरकर, पवन ऐकरे, अनिल सातपुते, आशीष रणदिवे, वसंत सातभाई, सोमेश्वर बालपांडे, सुरेश डाहूले, संजय झाडे, पी.एस. रामटेके, बी. सी. घोडेले, जीवतोडेजी, मंगेश येनूरकर, भास्कर पिंपळकर,नरेंद्र पिदूरकर यांनी अभिनंदन केले.
 
                                          
                                          
                                          
                                          
                                          


                                          
                                          
                                          

                      

