चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थीती बिकटचा झाली आहे.प्रशासनाकडून यावर आवर घालण्यासाठी ब्रेक द चैन च्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक कुटुंबियांनी विवाहाची परवानगी काढली आहे.पण सध्याची स्थीती लक्षात घेता कुटुंबियांनी स्वेच्छेने लग्नसमारंभ टाळावे असे आवाहन गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी केले आहे.
अशा स्थीतीत जर लग्नसमारंभ कुणी करीत असतील तर केवळ पंचेवीस लौकांच्या उपस्थीतीत अकरा ते एक वाजताच्या दरम्यान त्यांनी समारंभ निपटवावेत.
जर नियमांचे उल्लंघन झाले तर पन्नास हजार रूपयाच्या दंडासोबत कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
उद्यापासून सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणा,फळांचे दुकान,भाजीपाला,मासमटनाचे दुकान उघडता येतील.अत्यावश्यक सेवा मेडिकल पुर्ण वेळ सूरू असतील.
सध्या बांधकामावर पुर्णत बंदी आहे.यामुळ हार्डवेअर दूकान पुर्णत बःदच ठेवावीत. कोरोनाच्या या महासंकटाला हरविण्यासाठी आपण सर्वांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.गोःडपिपरी तालुक्यातील नागरिकाःनी,व्यावसायीकांनी नियमांचे काटोकोर पालन करण्याचे आवाहन तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी केले आहे.