वेकोलि राजीव रतन कोविड रुग्णालयाची दारे सामान्य नागरिकांसाठी उघडा : राजूरेड्डी

घुग्घुस : वेकोलीचा राजीव रतन रुग्णालयाला केंद्रीय रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला मात्र हा दर्जा फक्त कागदोपत्री व नावापुरताच होता.
याठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना काडीचाही लाभ मिळत नव्हता.

राज्यात सद्या कोरोना कोविड – 19 संक्रमणाची दुसरी लाट आलेली असून जिल्ह्यातील शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने घुग्घुस येथील नागरिकांना गावातच उपचार मिळावा याकरीता तसेच घुग्घुस परिसरात कोरोना बाधीत रुग्णाची अत्यंत वेगाने होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार व खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना राजीव रतन रुग्णालयात कोविड रुग्णालय शुरू करण्याची मागणी मी केली होती.

खासदार यांनी वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करून राजीव रतन येथे 22 खाटांचा कोविड रुग्णालय शुरू करण्यात आलेले आहे.
यासोबतच टेम्पो क्लब येथे कोविड रुग्णालयाचा निर्माण होत आहे. मात्र याठिकाणी केवळ वेकोलीच्या कर्मचाऱ्यांचा उपचार करण्याचा आळमुठा धोरण वेकोलीने अंगीकारले असून महामारीच्या काळात केंद्रीय रुग्णालयाने सर्व सामान्य गोर – गरीब जनतेला मदद करण्या ऐवजी वाऱ्यावर सोडणाऱ्या वेकोलीच्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

वेकोलीच्या रेल्वे सायडिंगमूळे संपूर्ण घुग्घुस शहराला प्रदूषणाची झळ सोसावी लागते. त्यामुळे राजीव रतन रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारावर सामान्य नागरिकांचा अधिकार असून हा अधिकार न मिळाल्यास घुग्घुस काँग्रेस तर्फे वेकोली विरोधात आंदोलनाचा इशारा काँग्रेस नेते राजूरेड्डी यांनी दिला असून घुग्घुस येथील राजीव रतन रुग्णालयातील भोंगळ कारभाराची तक्रार पालकमंत्री तसेच खासदारांना करण्यात आलेली आहे.