घुग्घुस : शास्त्री नगर वार्ड क्र.०५ इथे बसवण्यात आलेले सोलर पॅनल मागील चार ते पाच महिन्या पासून बंद पडलेले आहे परंतु नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. एकीकडे “जल ही जीवन है” हे नारे लावल्याजातात तिथेच शास्त्री नगर परिसरातील नागरिकांना सोलर पॅनल बंद असल्यामुळे पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ही बाब आम आदमी पार्टी घुग्घुस च्या लक्षात येताच अमीत बोरकर यांनी नगरपरिषद मुख्य अधिकारी अर्शिया जुही यांच्या कडे मागणी करण्यात आली व लवकरात लवकर सोलर पॅनल ची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
त्यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, सागर बिऱ्हाडे,सह सचिव विकास खाडे, सोनू शेट्टीयार, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, अनुप नळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.