आरोग्य विभागाच्या परीक्षार्थीसाठी पुढील तारखांवर मोफत एस. टी प्रवास द्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यापुढे परिक्षा घेतांना प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा केंद्र द्या

असमर्थता दाखविणाऱ्या न्यासा कंपनीवर कारवाई करा

खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : राज्यातील आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील परीक्षा दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर असे दोन दिवस निश्चित करण्यात आल्या त्यानुसार विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनाने कशीबशी व्यवस्था करून आपले परीक्षा केंद्र गाठले परंतु अचानक काल उशिरा रात्री परीक्षा रद्द केल्याचे आरोग्य मंत्र्यानी जाहीर केले. त्यामुळे परीक्षार्थ्यांना तीव्र मानसिक व आर्थिक त्रास झाला.

हे परीक्षार्थी गरीब कुटुंबातील असून प्रत्येकाला १००० ते १५०० चा आर्थिक भुर्दड पडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षार्थीसाठी पुढील तारखांवर मोफत एस. टी प्रवास देऊन असमर्थता दाखविणाऱ्या न्यासा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर सारख्या अतिदुर्गम जिवती, पोंभुर्णा, राजुरा यासह अन्य भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई नागपूरसह मोठ्या शहरात परिक्षा केंद्र देण्यात आले. त्यानुसार दोन दिवसापूर्वीच परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर जाऊन सज्ज होते. परंतु राज्य सरकारने अचानकपणे परीक्षा रद्द केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवासावर राहण्यावर केलेला खर्च वाया गेला असून त्यांच्या खर्चाची भरपाई शासनाने करावी व यापुढे परिक्षा घेतांना प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणीही खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.