खेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास : खासदार बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा देखील विकास होईल. त्यामुळे खेड्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे, असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.

मुल तालुक्यातील केळझर येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शाखा केळझरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी आशा वर्कर्स व कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीतील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळेस खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, विनोद अहिरकर, राज यादव, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, बसंत सींग, मदन दुर्गे, प्रमोद निमगडे, शीतल मराठे, योगिता रणदिवे, निकोडे, बयाबाई लाकडे, मंगला बोरूले, नीता मराठे, ताजुभाई, आशिष अहिरकर, खोब्रागडे, गुरुदास ठाकरे, रायपुरे, वैशाली मराठे यांची उपस्थिती होती. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.