चंद्रपूर : कोरोना काळात लोक विविध आजाराने ग्रस्त आहेत. सध्या घडीला कोरपना तालुक्यात कोरोनाचा करह सर्विकडे बघावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या गाईडलाईन नुसार प्रत्येकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखेने गरजेचे आहे.
अशातच दिनांक 25 मे 2021 रोजी नारंडा ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने नारंडा येथे ग्राम पंचायत सदस्य मिलिंद आनंद ताकसांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारंडा येथील हनुमान मंदिरा मध्ये गावातील नागरिकांना ग्रामगिता पुस्तक व गावातील नागरिकांना मास्कचे सुध्दा वितरण करण्यात आले . दालमिया सिमेंट च्या कामगारांना मिठाई वाटून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
परिसरातील रस्त्यांची स्वच्छता सुद्धा करण्यात आली. मी मास्क वापरतोय तुम्ही पण मास्क वापरा. परिसरात, घरी स्वच्छता राखा असे आवाहन मिलिंद ताकसांडे यांनी केले. यावेळी गावातील वरिष्ठ नागरिक व युवा वर्ग कंपनी कामगार उपस्थित होते.