चंद्रपुरचे इंदिरानगर मध्ये अवैध दारू विरुद्ध महिलांचा एल्गार

चंद्रपूर : इंदिरानगर, स्वामी विवेकानंद चौक, पंडीत जवाहरलाल नेहरु शाळेसमोर येथील विरेंद्र साना, सचिन कुंभारे, वदना कुंभारे, सुरेखा गाळेकर उर्फ डोमी गाळेकर सदर सगळी व्यक्ति अवैधरित्या दारूचा व्यवसाय करतात.

यापैकी वीरेंद्र साना व सचिन कुंभारे यांना वार्डातिल लोकांनी दारू विक्री बंद करण्यास सांगीतले असता यांनी वार्डातील लोकांना मारण्याची धमकी दिली, डोमी गोळकर या महिलेने तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही पोलिसांना हफ्ता देतो असे म्हणत भांडण करतात.याची तक्रार पालीस प्रशासनाला करून सुद्धा काहीही कारवाई झाली नाही.

यामुळे वार्डातिल नागरिकांनी एकत्र येत यापुढे दारूविक्री बंद न केल्यास त्यांच्या घरी जावून दारू बंद करू यात काही विपरीत घडल्यास अवैध दारू विक्रेते जबाबदार राहणार असा इशाराही नागरिकांनी दिला.
यावेळी इंदिरा नगर प्रभागाचे नगरसेवक अमजद अली यांच्या पुढाकाराने वार्डातिल रेखा लोहांडे, आशा हिंगे, संगीता वंगलवार, शशिकला चौधरी, कुसुम बावने, अरुणा गणवीर, संगीता नवले, छबु खोब्रागडे, आशा खोब्रागडे, ज्योती सोनटक्के, रेखा मडावी, अल्का उपरे , कविता मडावी, रंजना धन्डरे, ललिता वराडे, सिमा वराडे, रेखा ठाकरे आदी महिला उपस्थित होत्या.