भारत बंद निमित्त सर्व पक्षीय विशाल बैलबंडी व ट्रॅक्टर मोर्चा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायद्या करा,वीज विधेयक 2020 बिल मागे घ्या, कामगारांना बरबाद करणाऱ्या चार श्रम सहिता रद्द करा आणि पेटोल डिझेल व गॅस भाव कमी करा या व इतर मागणीसाठी देशातील लाखो शेतकरी गेल्या नऊ महिन्यांपासून दिल्ली येथील विविध रोड वर रात्रं दिवस थंडी वाऱ्यात बसून आंदोलन करीत आहेत.

परंतु केंद्राचे मोदी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. आणि म्हणून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सयुक्त किसान कामगार मोर्चाचे वतीने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद ची घोषणा केली होती.त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध जन संघटनाच्या वतीने स्थानिक हुतात्मा स्मारक येथून दुपारी एक वाजता विशाल बैल बंडी ट्रॅक्टर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला .तत्पूर्वी शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. विनोद झोडगे, काँगेसचे तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जगदीश पीलारे, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख मिलिंद भंनारे, बी.आर एस.पी.चे प्रा.संजय. मगर, वंचित बहुजन आघाडीचे डा. प्रेमलाल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते. डा. देवेश कांबळे,प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड.हेमंत उरकूडे,खोरीपा चे राष्ट्रीय उपाद्यक्ष जीवन बागडे,समता सनिक दलाचे जयप्रकाश धोंगडे, मनसेचे तालुका प्रमुख सूरज शेंडे, ओबिसी संघटनेचे हरीचंद्र चोले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इकबाल जेसानी, किसान सभेचे राहुल पांडव,लाल बावटा महिला संघटनेच्या नेत्या ललिता चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या स्मिता पारधी, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, बालु पिलारे, मुन्ना रामटेके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वासू सोंदरकर, किसान काँग्रेसचे नानाजी तुपट, सुरेश दर्वे, प्रमोद मोटघरे, नगरसेवक महेश भर्रे, प्रकाश खोब्रागडे, महिला काँग्रेसच्या मंगला लोनबले, मनोज वझाडे,राहुल भोयर,राजेश माटे, प्रफुल करंडे, सुनील तोंडरे, अवि सोनवणे, जनता ठेंगरी, कांचन पिलारे, अनिल भानारकर, शिवसेना उप तालुका प्रमुख पराग माठे, किशोर चौधरी, अमोल माकोडे, शाम भानरकर, कमुनिस्त पक्षाचे विनोद राऊत, विष्णू ठवरे, विवेक नरूले, अभिजित लोणकर, रवि अवसरे,महादेव राऊत, शंकर डोईजड, बी.आर. एस.पी.चे गोपाल मेंढे, मारखंडी बावणे इत्यादी पक्ष व जन संघटनांचे बहु संख्येने कार्यकर्ते व जनता उपस्थित होते.