आमदारांनी आपली खुर्ची त्या महिलेला देऊन स्वतः दगडावर बसल्यात हा फोटो सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दगडावर सहजपणे बसलेल्या वरोरा विधानसभेच्या आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांचा हा फोटो सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होत आहे.
भद्रावतीच्या शास्त्री नगरातील एका विकासात्मक कामाच्या भूमीपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर चहा घेते वेळी आमदार धानोरकर यांना वयस्कर महीला पदाधिकारी ऊभ्या दिसल्या.

त्यांनी आपली खुर्ची त्या महीला पदाधिकारीस देऊन आमदार धानोरकर स्वतः मात्र दगडावर बसल्यात. हा फोटो सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल झाला आहे.आमदार धानोरकर यांचा हा साधेपणा अनेकांना भावला.

या वायरल फोटो बाबत काँग्रेस सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष विलास टिपले यांनी सांगीतले, हा फोटो एका कार्यकर्त्याने कुणालाच कल्पना नसतांना काढला व पुढे तो व्हायरल झाला.मुळात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सत्तेचा कधीही गर्व केला नाही. विनयशील संस्कृती व त्यांच्या सहज, सोप्या भाषा शैलीतील संवादाने आमदारताई सामान्य कार्यकर्त्यांनाही आपल्यातीलच वाटतात. अगदी सहजपणे त्या नागरिकांना भेटतात. मतदार संघाच्या विकासासाठी धडपड व त्यांच्या स्वभावामुळे आमदार सौ. प्रतिभा धानोरकर अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या आहेत. असेही टिपले म्हणाले.