मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्य घुग्घुस येथे देवराव भोंगळे यांच्या हस्ते विविध सेवाकार्य संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्ष पूर्ण झाले. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सेवाकार्याच्या माध्यमातुन सेवा सप्ताह राबवण्यात येणार आहे.

घुग्घुस शहरात मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्याने भाजपा तर्फे सेवाकार्याचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

रविवार 30 मे रोजी सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे जाहीर केल्याप्रमाणे कोविड आजारामध्ये अनाथ झालेल्या दोन अनाथ मुलांना शिक्षणासाठी चेकद्वारे आर्थिक मदत करण्यात आली.

या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वाटप, कोविड रुग्णांचा अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, कोविड रुग्णवाहीका चालकांचा सत्कार, 25 हजार मास्क वितरण, परिचारिका व आशावर्कर यांचा सुरक्षा किट देऊन सत्कार व भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की मोदी सरकारला 7 वर्षपूर्ण होत असल्याने आज जिल्ह्यात विविध सेवा कार्य राबवित आहोत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मोठया प्रमाणात उपलब्ध करून दिले, ते आज वाटप करण्यात येत आहे. घुग्घुस येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येणार असे आवाहन करण्यात आले होते, त्याअनुषंगाने आज दोन अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत देत आहोत. कोविडच्या लढ्यात मदत करण्यासाठी कोविड महामारीतून मुक्तता मिळण्यासाठी सर्व सेवा कार्यक्रम आम्ही राबवित आहोत.

या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. सभापती सौ. नितुताई चौधरी, भाजपा वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, उत्तर भारतीय आघाडीचे संजय तिवारी रत्नेश सिंग, पंस माजी उपसभापती निरीक्षक तांड्रा, माजी जिप सदस्य चिन्नजी नलभोगा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, राजेश मोरपाका, भाजपा नेते प्रवीण सोदारी सुरेंद्र भोंगळे, श्रीकांत सावे, धनराज पारखी, नितीन काळे, असगर खान, सिणू कोत्तुर, उपस्थित होते.